Skip to Content

जागतिक महीला दिनानिमित्त मेढा नगरीतील माता-भगिनींचा होणार सन्मान...

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातुर जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजसाहेब यांच्या विशेष उपस्थितीत पार पडणार कार्यक्रम
5 March 2025 by
mohsin shaikh


महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातुर जिल्हा पालकमंत्री

मा.ना.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजसाहेब यांचे विशेष उपस्थितीत,

शनिवारी दि.08/03/2025 रोजी  दुपारी 3.00 ते 6.00 या वेळेत मेढा शहरातील सर्व माता-भगिनींचा सन्मान कलश मंगल कार्यालय एसटी डेपो समोर होणार आहे.



भाजपाचे नेते,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली,   जागतिक महिला दिनाचे आयोजन केले जात आहे.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी बाबाराजे मित्र समुह आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत,जास्तीत जास्त महीला कार्यक्रमाला उपस्थित राहतील त्यासाठी प्रभागात मिटींग व भेटीगाठी चालु आहेत.


विशेष म्हणजे बाबाराजेंच्या सुचनेनुसार

मेढा शहरातील सर्व सन्माननीय माता-भगिनींचा सन्मान आकर्षक भेटवस्तू देऊन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजसाहेब हे करनार आहेत.जि.प.माजी सदस्य सौ अर्चनाताई रांजणे या पण उपस्थित राहनार आहेत.


कार्यक्रमाची रुपरेषा पुढील प्रमाणे राहील.


दुपारी 3.00 वाजता सुमधुर संगीताने सुरवात होईल.त्या नंतर स्नेहा धडवई या होम मिनिस्टर पैठणी आणि विविध खेळ स्पर्धा घेनार आहेत.त्यात  विविध प्रकारची बक्षीस ठेवण्यात आली आहेत.आणि खास आकर्षण झी मराठी फेम *पारू* ही अभिनेत्री सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहनार आहे. कार्यक्रमाचे सुत्र संचलन सौ मापारी मॅडम करनार आहेत.


तत्पुर्वी कार्यालयात प्रवेश घेताना प्रत्येक मेढा नगरीतील महीलांनी आपले नांव,मोबाईल नंबर त्या ठीकाणी नोंद करुन कूपन ताब्यात घ्यावे.कार्यक्रम संपलेवर कुपन जमा करुन भेटवस्तु देनेत येईल याची नोंद घ्यावी.अशी माहिती संयोजकांनी दिली.

in News