Skip to Content

मेढा एस.टी. डेपोसाठी मिळाल्या नवीन ८ गाड्या ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांच्या हस्ते लोकार्पण

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती महाराज शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण
9 March 2025 by
mohsin shaikh

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांच्या पाठपुराव्यातून 


पहिल्या टप्प्यात मेढा डेपोसाठी नवीन ८ गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. मेढ्यासाठी आणखी १६ आणि सातारा डेपोसाठी १३ नवीन बसेस लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु आहे. दरम्यान, नवीन आठ गाड्यांपैकी २ बसेस मेढा ते कुर्ला- नेहरूनगर, १ बस मेढा ते मुंबई, १ बस मेढा ते बार्शी, २ बसेस मेढा ते नाशिक तर उर्वरित २ बसेस मेढा ते परळी-वैजनाथ अशा धावणार आहेत. या नवीन बसेसमुळे जावली तालुक्यातील प्रवाशांना तसेच बाहेरून जावली तालुक्यात येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आला 

यावेळी तहसीलदार हनुमंत कोळेकर ,विभाग नियंत्रक सातारा श्री पतंगे, गट विकास अधिकारी निलेश पाटील , सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील,आगर प्रमुख निता बाबर

मेढा नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग बापू जवळ, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार, माजी उपसभापती कांतीभाई देशमुख, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलजी देशपांडे,बांधकाम समिती सभापती विकासजी देशपांडे , युवानेते संतोषजी वारागडे, समीरभाई आतार,बाळासाहेब पंडित् , सादिकभाई सय्यद, धनंजय खटावकर, इम्रान आतार,संदीप जवळ, मोहसिन शेख़ आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

in News