Skip to Content

मेढा नगरीत भव्य असा जागतिक महीला दिन साजरा...

रेकॉर्ड ब्रेक गर्दीने सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांचे स्वागत
9 March 2025 by
mohsin shaikh


शनिवार ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे आयोजन भारतीय जनता पार्टी व बाबाराजे मित्र समुह यांनी मेढा येथील कलश मंगल कार्यालयात केले होते.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांचे उपस्थितीत मेढा नगरीतील सन्माननीय महिलांचा आकर्षक भेटवस्तू देऊन महाराजसाहेबांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी हजारोंचे संख्येने  माता-भगिनी उपस्थित होत्या.



दरम्यान महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांचा मेढा नगरीच्या वतीने भव्य असा  नागरी सत्कार करण्यात आला.

होम मिनिस्टर कार्यक्रमाला पण प्रचंड गर्दी झाली होती.यामधे सुध्दा पैठणीसह विविध बक्षीसांचे वितरण बाबाराजेंचे हस्ते  करण्यात आहे. कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.



 कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे उद्योजक विजय शेलार,पांडुरंग जवळ ,दत्तात्रय पवार, अनिल शिंदे, महिला पदाधिकारी, माजी सभापती रुपालीताई वारागडे,संगीता वारागडे,कल्पना जवळ ,रेश्मा शेडगे ,दिपाली शिंदे ,सुवर्णा गोरे ,रुपाली देशपांडे ,भारती देशमुख ,शुभांगी देशपांडे आदी नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



हा कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी माजी उपसभापती कांतीबाई देशमुख ,शिवाजीराव देशमुख ,शिवाजीराव गोरे ,संतोषजी वारागडे ,संजयजी सपकाळ ,मोहसिन शेख ,इमरान आतार ,संतोष करंजेकर ,संदीप पवार ,ओमकार पवार ,कैलास पवार ,विद्याधर धनावडे ,जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे ,दादा शेलार ,शंकर देशमुख ,प्रताप देशमुख ,संकेत करंजेकर,सुशांत गाडवे ,निखिल ओतारी,विशाल बेंद्रे ,धनंजय खटावकर ,नगरसेवक विकास देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले. 


सौ योगिता मापारी मॅडम यांनी सुत्र संचलन केले.

श्री विठ्ठल देशपांडे यांनी आभार मानले.

in News