Skip to Content

प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजप चे उमेदवार विकास देशपांडेंची यांची दमदार कामगिरी! केलेल्या विकासकामांमुळे जनता परत एकदा निवडून देणार?

24 November 2025 by
mohsin shaikh

मेढा:-

सध्या जावली तालुक्यात एकमेव नगरपंचायत असलेल्या मेढा नगरपंचायतीच्या निवडणूकीचे धुमशान सुरु आहे. माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक सात मध्ये, मेढ्याचे जेष्ठ भाजप कार्यकर्ते श्री. विकास उर्फ पांडुरंग देशपांडे हे प्रभाग नंबर सात मधून निवडणूक लढवत आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत ते याच वार्डमधून निवडून आले होते. गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत त्यानी लाखो रुपयाची कामे आदरणीय महाराज साहेबांच्या आशिर्वादाने पार पाडली आहेत. त्यामुळे य वेळेस ही प्रभाग क्रमांक सात मधील मलाच निवडून देतील असा विश्वास त्यानी व्यक्त केला.


पुढे ते म्हणाले की, चंद्रमानगर बैल बाजार रोड वसाहत, स्वामी समर्थ नगर या ठिकाणी लोकांना चालायला रस्ता नव्हता, गुडघ्या एवढा चिखल होता, लाईट नव्हती, गटार नव्हते, पाण्याची पाईपलाईन नव्हती एवढे आव्हान डोळ्यापुढे असताना तेथील जनतेला नोव्हेंबर २०१६ ला मत मागायला गेलो, तेव्हा शब्द दिला होता की निवडून द्या एक वर्षात तुमचं काम करून दाखवतो. पण आदरणीय महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक सात मधील जनतेला दिलेला शब्द खरा करून दाखवला.


बैल बाजार रोड, स्वामी समर्थ नगर, या ठिकाणी दोन्ही बाजू बंदिस्त गटार, खडी करण, डांबरीकरण, स्ट्रीट लाईट, पाण्याची पाईपलाईन, बसण्यासाठी बेंच, जायला रस्ता नव्हता, साकवपूल मोठ्या पाईप टाकून त्या ठिकाणी केला. नॉन रिटर्निंग वॉल केली, त्यामुळे आज जनतेच्या विश्वासात पात्र ठरल्यामुळे पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक सात मधील जनता भारतीय जनता पार्टी आणि माननीय नामदार बाबाराजेंच्या पाठीशी उभे राहून कमळ चिन्हावरील उमेदवाराला मतदान करेल यात तिळमात्र शंका नाही.


प्रभाग क्रमांक सात मधील महाबळेश्वर सातारा रस्त्यालगत, गणेश स्वीट मार्ट पासून, बाबू वामन पवार, यांच्या घरापर्यंत उकडलेला रस्ता होता. तो खडी करून डांबरीकरण केला. त्या ठिकाणी वन साईड बंदिस्त गटार केले. ज्यांना पाण्याची सोय नव्हती त्यांना सेपरेट पाईपलाईन टाकून दिली. डॉक्टर कांबळे, राजेंद्र मुळे, विकास तरडे यांच्या घराकडे पाणी शिरत होते. त्या ठिकाणी दोन्ही साईड बंदिस्त गटार योजना राबवली. बसण्यासाठी बेंच लावून दिले. त्या ठिकाणी खडीकरण डांबरीकरण केले. ठिकठिकाणी एलईडी लॅम्प लावले.

जे जे प्रभाग क्रमांक सात मध्ये जनतेला मतदानाच्या वेळी आश्वासन दिले होते, ते माननीय नामदार बाबाराजेंच्या मार्गदर्शनाखाली दिलेला शब्द खरा करून दाखवला. यापुढे सुद्धा जे जे जनतेला मी आश्वासन देऊ, तेथे माननीय नामदार बाबाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली नक्की पूर्ण करून दाखवू. त्यामुळे प्रभाग क्रमांक सात मध्ये जनतेने पूर्वी माझ्यावर जो भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास दाखवला, बाबाराजेंवर जो विश्वास दाखवला, तोच विश्वास आज पण दाखवावा आणि प्रचंड मताने भारतीय जनता पार्टी कमळ चिन्ह याला मतदान करून निवडून आणावे अशी नम्र विनंती त्यानी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

in News