मेढा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी विकास देशपांडे यांची निवड
श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजांनी दिला निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय
मेढा नगरपंचायतीच्या राजकारणात आज इतिहास घडला! भारतीय जनता पार्टीचे कणखर, जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केलेले आणि संघटन कौशल्यासाठी ओळखले जाणारे विकास देशपांडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड होऊन विकासपर्वाची अधिकृत सुरुवात झाली आहे.
ही निवड म्हणजे केवळ पदाची नाही, तर निष्ठा, परिश्रम आणि जनसेवेच्या कार्याला मिळालेली पावती आहे.
या संपूर्ण घडामोडींच्या केंद्रस्थानी असलेले नेतृत्व म्हणजेच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज. दूरदृष्टी, ठाम निर्णयक्षमता आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी यांचे प्रतीक असलेल्या शिवेंद्रसिंहराजे महाराजांनी आपल्या निष्ठावंत व कर्तृत्ववान कार्यकर्त्याला न्याय देत, भाजपच्या तळागाळातील नेतृत्व मजबूत केल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती-पातीपलीकडे जाऊन सर्व समाजाला सोबत घेत स्वराज्य उभारले आणि न्याय दिला.
आज त्याच परंपरेचा वारसा जपत छत्रपतींचे वंशज, मा.ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजसाहेब यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, सामान्य कुटुंबातील तरुणाला—कोणताही जाती-पातीचा विचार न करता—विकास देशपांडे यांना संधी दिली.
असा व्यापक, समतावादी आणि दूरदृष्टीचा निर्णय घेणे हे फक्त आणि फक्त महाराजसाहेबच करू शकतात.
शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजांचे मार्गदर्शन आणि विकास देशपांडे यांचे सक्षम नेतृत्व यांच्या समन्वयातून मेढा शहरात विकास, सुशासन आणि जनहिताचा सुवर्णकाळ सुरू होणार, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.