Skip to Content

मा.ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांचे कट्टर समर्थक असलेल्या विकास देशपांडे यांची भाजप मंडळ अध्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारी पदी निवड.

3 April 2025 by
mohsin shaikh


मा.ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांचे कट्टर समर्थक असलेल्या विकास देशपांडे यांची भाजप मंडळ अध्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारी पदी निवड.


भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे मेढा नगरीचे माजी बांधकाम समिती सभापती विकास देशपांडे यांची सातारा शहर मंडल अध्यक्ष निवडीच्या निवडणूक निर्णय अधिकारी पदी निवड करण्यात आली.


तत्पूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला मंडल निवडीच्या निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी दिली. याचा आनंद मेढा नगरीतील लोकांना व भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना झाला.


विकास देशपांडे यांची यासंदर्भात प्रतिक्रिया घेताना ते म्हणाले माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज आणि भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवला त्याबद्दल बाबाराजे आणि पक्षाचे मनापासून धन्यवाद.


तत्पूर्वी दिनाक ३ एप्रिल रोजी

सातारा मंडल अध्यक्ष निवडी बाबतीत सातारा सर्किट हाऊस येथे बैठक पार पाडली. या बैठकी वेळी भारतीय जनता पार्टीने  ठरवुन दिलेल्या नियमावली प्रमाणे विविध नेते मंडळीचे मत अजमावुन घेतले व वरिष्ठांना कळवले आहे.वरिष्ठ पातळीवर त्या संदर्भात निर्णय प्रक्रिया पार पडेल.यावेळी श्री सुनील तात्या काटकर श्री अविनाश जी कदम माजी नगराध्यक्ष सौ रंजनाताई रावत श्री विठ्ठलजी बलसेटवार श्री विकास जी गोसावी श्री विकल्प जी शहा किशोरजी गोडबोले यासह अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व नेते यावेळी उपस्थित होते.

in News