🗳️ मेढा नगरपंचायत निवडणूक 2025 : प्रभाग क्र. १७ मध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता
मेढा (ता. जावळी) – मेढा नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर देशमुख आळीतील प्रभाग क्रमांक १७ (महिला सर्वसाधारण) मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. हा प्रभाग सुर्वे यांच्या घरापासून ते सूरज देशमुख यांच्या घरापर्यंत पसरलेला आहे.
या प्रभागात विकास देशपांडे, किरण ढेबे, शिवाजीराव देशमुख, संजय सुर्वे यांचे सामाजिक व राजकीय वर्चस्व आहे. त्यामुळे प्रभागात त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण मेढा नगरीचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी याच प्रभागातून कै. नारायण देशमुख हे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
सध्या या प्रभागातून पुढील इच्छुक उमेदवार चर्चेत आहेत:
🔸 काजल शंकर देशमुख
🔸 माधुरी संजय सुर्वे
🔸 रेश्मा शिवराम शेटे
🔸 शितल किरण चिकणे
या उमेदवारांच्या पतींच्या पार्श्वभूमीकडे पाहिल्यास —
👉 शंकर देशमुख हे कै. नारायण देशमुख यांचे पुतणे असून त्यांच्या पाठिशी पारंपरिक मतदारांचा पाठिंबा आहे.
👉 किरण चिकणे हे स्थानिक व्यायाम मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत
👉 शिवराम शेटे हे सुद्धा स्थानिक व्यायाम मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत, तर
👉 संजय सुर्वे हे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे स्थानिक नेते म्हणून ओळखले जातात.
दरम्यान, या प्रभागातून आणखी दोन इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी जोरदार चर्चा आहे. मात्र त्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. ही नावे जाहीर झाल्यास प्रभाग क्रमांक १७ मध्ये निवडणूक अत्यंत अटीतटीची व चुरशीची ठरेल, अशी शक्यता आहे.
या सर्व घडामोडींमध्ये विकास देशपांडे यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता असून, त्यांच्या राजकीय चालीवर या प्रभागाची निवडणूक बऱ्याच अंशी अवलंबून राहणार आहे.
तत्पूर्वी
कै. नारायण देशमुख व विकास देशपांडे यांनी केलेल्या विकासकामांची जोरदार चर्चा होत आहे.
श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात ३ पेज लाईन बंदिस्त गटारे, डांबरी आणि काँक्रिटचे रस्ते, तसेच पाईपलाइनसारखी मूलभूत पायाभूत विकासकामे करण्यात आली आहेत.
ही विकासकामे जनतेच्या नजरेस पडत असून, यामुळेच या भागात जनतेचा विश्वास व पाठिंबा वाढल्याचे चित्र आहे. यामुळेच विजयी उमेदवाराच्या मताधिक्याएवढी मते केवळ या कामांमुळे मिळतील अशी चर्चा सध्या रंगली आहे.
---