मेढा : भारताचे स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणास्थान असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला यावर्षी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने तालुका स्तरावरही “वंदे मातरम्” कार्यक्रमाची तयारी सुरू आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तालुकास्तरीय समितीची बैठक तहसील कार्यालय, जावळी येथे आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता पार पडली. या बैठकीस तहसीलदार तथा तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष मा.हणमंत कोळेकर अध्यक्षस्थानी होते.


बैठकीस नायब तहसीलदार श्री.सुनील मुनाळे , मेढा नगरपंचायतीचे बांधकाम समिती सभापती आणि IMC सदस्य श्री.विकासजी देशपांडे, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र अध्यक्ष श्री.विलासबाबा जवळ, श्री.प्राचार्य बापूराव पाटील सौ.प्राचार्या अश्विनी शिंदे , श्री.अमर माने, श्री.चंद्रकांत कर्णे, श्री.उमेश यादव, श्री. सुहास पाटील, श्री.प्रकाश परांजपे, श्री.मोहसिन शेख
बैठकीस उपस्थित होते. बैठकीत आगामी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी नियोजित “वंदे मातरम्” कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सविस्तर नियोजन करण्यात आले.
बैठकीदरम्यान कार्यक्रमातील विविध सांस्कृतिक उपक्रम, गीतगायन, वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा यांसारख्या क्रियाकलापांची रूपरेषा ठरविण्यात आली.
— ✍️ वार्ताहर : (मेढा) जावळी प्रतिनिधी