📰 मेढा नगरपंचायत निवडणूक 2025
🔷 प्रभाग क्रमांक १६ (आरक्षित) – अंतिम उमेदवार कोण?
मेढा (ता. जावळी) – येथील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ (आरक्षित) मध्ये जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. वृंदावन कॉलनी, पोलिस वसाहत ते बौद्ध वस्ती असा विस्तार असलेल्या या प्रभागात सध्या इच्छुक उमेदवार म्हणून संदीप पवार आणि मधुकर शेलार यांची नावे चर्चेत आहेत.
या प्रभागाच्या माजी नगरसेविका संजना सावंत यांच्या कार्यकाळात श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांच्या विशेष प्रयत्नाने व मार्गदर्शनाखाली लाखो रुपयांचे रस्ते, बंदिस्त गटारे व इतर विकासकामे प्रभावीपणे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येथील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण असून विकासकामांमुळे विश्वास अधिक बळकट झाला आहे.
महाराज जे उमेदवार देतात, त्यांचे यश निश्चित मानले जात आहे. त्यामुळे अंतिम नाव अद्याप गुलदस्त्यात असले तरी महाराजांचा आदेश आणि पाठिंबा लाभणारा उमेदवारच विजयी होणार, असे चित्र स्पष्ट दिसत आहे.
---
🖋️ बातमी: बोल परखड डिजिटल मीडिया
📍 प्रभाग १६, मेढा नगरपंचायत – सातारा जिल्हा
---