शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन मेढा येथे
मेढा (जावळी), ४ जून २०२५ – वीर जिवा महाले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेढा (जावळी) यांच्या वतीने भव्य शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ६ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार आहे.
उद्घाटन मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओद्वारे होणार असून,
प्रमुख अतिथी म्हणून सौ. निता बाबर, आगार व्यवस्थापक मेढा उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. प्रकाश शिंदे, निवृत्त बँक अधिकारी (IDBI BANK) व सामाजिक कार्यकर्ते यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमामध्ये "नागरी कर्तव्य आणि शिस्ताचार" या विषयावर सखोल विचार मांडले जाणार आहेत.
या कार्यक्रमाचे संकल्पना मांडणारे आहेत – मा. श्री. मंगल प्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महाराष्ट्र राज्य.
कार्यक्रमाचे आयोजन वीर जिवा महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेढा (जावळी) यांनी केले असून, संस्थेचे प्राचार्य मा. सौ. ए. ए. शिंदे यांनी सर्वांना निमंत्रित करत आपली उपस्थिती लावण्याची नम्र विनंती केली आहे.
या कार्यक्रमात श्री विकास दामोदर देशपांडे, शासकीय कमिटी सदस्य, वीर जिवा महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेढा व बांधकाम नियोजन व विकास समितीचे मा. सभापती व भाजपा नगरसेवक, मेढा शहर यांनी देखील उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
🌹🙏🏻 सर्वांनी या पवित्र आणि प्रेरणादायी कार्यक्रमात अवश्य सहभागी व्हावे,
---